NEW

��सूचना : online test सोडवण्यासाठी उपलब्ध आहे.

Sunday, 20 August 2023

बोधकथा

रामकृष्ण परमहंस हे परमहंसपदाला पोहोचले, असं त्यांच्या शिष्यांना वाटायचं. खुद्द रामकृष्णांना मात्र याची जाणीव होती की त्यांच्यात काहीतरी उणीव आहे, एक टप्पा अजून पार व्हायचाय. अजून आपण 'तिथे' पोहोचलेलो नाही.

त्यांचे शेवटचे गुरू तोतापुरी यांना त्यांनी ही व्यथा सांगितली. बाबा तोतापुरी म्हणाले, तू सगळं सोडलंस पण कालीला सोडलं नाहीस, देवाची आस सुटली नाही, तीही सोड. मग पार जाशील.

रामकृष्ण म्हणाले, पण कशी सोडू? आई आहे ती माझी. तिला कसं सोडू? तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पण, मी ध्यानात जातो तेव्हा ती समोर येऊन उभी ठाकते आणि मला चराचराचा विसर पडतो, मी त्यापुढे जाऊच शकत नाही.

तोतापुरी म्हणाले, आता तू ध्यानाला बसलास आणि काली समोर आली की तलवारीने खांडोळी करून टाक तिची.

रामकृष्ण म्हणाले, तलवार कुठून आणू?

तोतापुरी म्हणाले, काली कुठून आणलीस, तिथूनच. कल्पनेतल्या देवीला कल्पनेतल्या तलवारीने नष्ट कर आणि द्वैत संपवून परमात्मस्वरूपात विलीन होऊन जा, असं त्यांना म्हणायचं होतं. 

काली दिसली की आपण हरवून जातो आणि आपलं भान हरपतं, असं परमहंसांनी सांगितल्यावर तोतापुरी बाहेर गेले. त्यांनी काचेचा एक तुकडा आणला. म्हणाले, ध्यानाला बस. काली आली की मला कळेलच. मग मी तुझ्या डोक्यावर या काचेने ओरखडेन. तू भानावर ये आणि कालीचे दोन तुकडे करून टाक तलवारीने.

रामकृष्ण ध्यानाला बसले. 

त्यांच्या मन:पटलावर काली आली, तेव्हा ते तोतापुरींना कळलं. त्यांनी रामकृष्णांच्या मस्तकावर असा काही ओरखडा काढला की रक्ताची धार लागली. रामकृष्ण आत जागे झाले. त्यांनी कालीची खांडोळी केली आणि असं म्हणतात की जवळपास सहा तास ते निश्चेष्ट अवस्थेत बसून होते… कसलीही हालचाल नव्हती.

डोळे उघडले तेव्हा ते म्हणाले, अखेरची बाधा नष्ट झाली, शेवटची पायरीही पार झाली…

Friday, 11 December 2020

यशस्वी जीवनाचा मूलमंत्र “शिक्षण”

यशस्वी जीवनाचा मूलमंत्र  शिक्षण

          मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास हा त्याच्या शिक्षणावरच अवलंबून असतो. तो जितका शिक्षणामध्ये ज्ञान अर्जित करतो तो तितकाच यशाच्या शिखरावर जाऊन बसतो. शिक्षणाची दिशा ही माणसाच्या संपुर्ण विकासासाठी आणि त्याच्या मुलभूत अधिकारांसाठी महत्वाची असते. देशाला आर्थिक महासत्ता आणि प्रभावी राष्ट्र बनवण्यात युवक महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. त्यामुळेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणाऱ्या शालेय शिक्षणाची आता देशाला गरज आहे .

विद्यार्जन करणे, हा शिक्षणाचा मुख्य हेतू होय.

सा विद्या या विमुक्तये

आपली दुःखे नाहीशी करून आपणाला सतत आनंद कसा मिळेल, याचे ज्ञान ज्याने मिळते, तिलाचविद्याअसे म्हणावे.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा पाया शाळेतच रचला जातो, शाळेत मिळालेल्या शिक्षणाच्या ,संस्कारच्या आणि मुल्यांच्या आधारावरच पुढील शिक्षणातील यश अवलंबून असते. शाळेत मिळणाऱ्या शिक्षणावरच देशाचे भवितव्य अवलंबून असल्याने शालेय शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तुमच्यातील जे काही सर्वोत्तम आहे ते प्रकट करणे म्हणजे खरे शिक्षण. मानवतेच्या पुस्तकापेक्षा जास्त चांगले पुस्तक कोठे असू शकते? असे महात्मा गांधी म्हणाले होते. खरी समस्या ही आहे की वास्तविकशिक्षणम्हणजे काय ? लोकांना ह्याची कल्पना नाही. एखाद्या जमिनीचे किंवा एखाद्या वस्तुचे मोल मोजावे , शेअर बाजारातील आपल्या शेअरचे मूल्यांकन करतो तसे आपण शिक्षणाचे मूल्यांकन करतो.

सध्याच्या शिक्षणपद्धतीत मुलाला जास्तीतजास्त गुण मिळवून त्याला आधुनिक  डॉक्टर , इजिनियर किंवा इतर चांगल्या व्यवसायात कसा प्रवेश मिळेल, इकडेच पालक आणि विद्यार्थी यांचे लक्ष असते. हुशार विद्यार्थी पुष्कळ अभ्यास करून आधुनिक डॉक्टर , इजिनियर आणि मोठे अधिकारी झाले अन् त्यांनी पुष्कळ पैसे मिळवले, तरीही ते सुखी-समाधानी होतीलच, याची शास्वती नसते. जे शिकल्यामुळे विद्यार्थी जास्तीत जास्त पैसे कमवू शकतील असेच शिक्षण मुलांना द्यावे असे आपल्याला वाटते. मात्र शिकलेल्यांच्या चरित्राचा विकास घडविण्याकडे आपण फारच थोडे लक्ष देतो. पालक, शिक्षक, सर्वसामान्य नागरिक यांची भूमिका या कामी बहुमोलाची आहे. ज्ञानाधिष्ठित समाजाच्या निर्मितीत विद्यार्थ्याला केवळ माहिती मिळवून भागणार नाही. तिचा उपयोग करण्याची कौशल्ये आणि मार्ग त्याला अनुभवातून आत्मसात करता येणे ही खरी आवश्यकता आहे.

शिक्षण म्हणजे काही पुस्तके वाचली, परिक्षा दिली उत्तीर्ण झालो असे नव्हे. शिक्षणाचे खरे महत्त्व समाजात रुजलेच नाही. शिक्षण म्हणजे माणसाच्या जन्मापासुन मरणापर्यंत चाललेली शिकण्यची प्रक्रिया आहे. एकविसाव्या शतकातही आपल्याला कायद्याचा बडगा उगारून शिक्षणाचे महत्त्व सांगावे लागते, … यासाठी आपला समाजच कारणीभूत आहे. आपल्या प्रजासत्ताक राज्य घटनेला 70 वर्षे होत आली तरीही, शिक्षणाचे सार्वत्रिकरण, समान सामाजिक न्याय, समान संधी आणि समान नागरी कायदा ही मार्गदर्शक तत्त्वे घटनेच्या पुस्तकातच राहिली आहेत. निरनिराळे विकास कार्यक्रम राबविण्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षित मनुष्यबळ वाढवून मानवी भांडवल निर्माण करण्याचे शिक्षण हे मुख्य साधन आहे.

ज्ञानसंवर्धन आणि बुद्धीमत्तेचा विकास करणे, जीवनातील नैतिक मूल्यांचे संगोपन आणि संवर्धन करणे, चारित्र्यसंपन्न व्यक्तीमत्त्व घडवणे या गोस्टी शिक्षणाने साध्य झाल्या, तरच त्याला खरे शिक्षण म्हणता येईल म्हणून प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक तसेच जीवनोपयोगी कौशल्ये विकसित करणारे शिक्षण सर्वांपर्यंत कसे पोहचेल याचा सर्वांनीच विचार करायला हवा कारण यशस्वी जीवनाचा मूलमंत्रशिक्षणहेच आहे.